कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टरांची निवास व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये

पुणे दि.28: आपल्या जीवाची  पर्वा न करता अहोरात्र कोरोना बाधित रुग्णांवर उपचार तसेच रुग्णांची सेवा करणा-या डॉक्टरांना विश्रांतीची अत्यंत आवश्यकता असते, हीच बाब लक्षात घेवून या डॉक्टरांच्या  राहण्याची व्यवस्था पुणे स्टेशन परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली असून त्याठिकाणी त्यांना आवश्यक त्या सर्व सोईसुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला असून या डॉक्टरांचीही विशेष काळजी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.
                 पुणे शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेत डॉक्टरांची मोठी टीम अहोरात्र कार्यरत आहे. आपल्या कुटुंबापासून दूर राहणे आवश्यक असल्याने प्रशासनाने या डॉक्टरांची राहण्याची वेगळी व्यवस्था केली आहे. पुणे स्टेशन परिसरासह शहरातील व्हीव्हीआयपी विश्रामगृहासह हॉटेल ब्लू डायमंड, हॉटेल लेमन ट्री या पंचतारांकित हॉटेलमध्ये निवास व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टरांसाठी दर्जेदार जेवण मिळावे, यासाठी नामांकित दोन केटर्सचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय - उपमुख्यमंत्री अजित पवार
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image