बारामती -दि.५बारामतीत होलार समाजाच्या वतीने यंदा शिखर शिंगणापूरची यात्रा रद्द करून समाजाच्या वतीने तीनशे गोरगरीब कुटुंबांना
धान्य वाटप घरोधरी जाऊन करण्यात आले. यावेळी समाजाच्या वतीने "सोशल डिस्टन्स" देखील पाळण्यात आला..
बारामती होलार समाज संघटनेच्या वतीने दरवर्षी शिखर-शिंगणापूर येथे यात्रेनिमित्त समाजाच्या वतीने कावडीतील सर्व शिवभक्तांसाठी दर वर्षी महाप्रसाद तसेच अन्नदानाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते.
मात्र यंदा देशामध्ये कोरोनाच सावट व सर्व ठिकाणी संचारबंदी तसेच १४ एप्रिलपर्यंत ' लॉकडाऊन ' ची घोषणा केली आहे . त्यामुळे यंदा शिखर शिंगणापूर यात्रेतील भंडारा रद्द करून यंदा समाजाच्या वतीने बारामतीतील गोरगरीब गरजू नागरिकांना धान्य वाटप करण्याचा निर्णय समाजाच्या वतीने घेण्यात आला. दरम्यान संचारबंदीमुळे हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांची दयनीय अवस्था होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूरची यात्रा (भंडारा) यंदा रद्द करून बारामतीत होलार समाजाच्या वतीने तीनशे गोरगरीब कुटुंबांना धान्य वाटप मदतीचा हात दिला आहे .