ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे जेष्ठांनी कोरोनाला हरवले

ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे जेष्ठांनी कोरोनाला हरवले 


पुणे :- ससूनमध्ये ७ वयोवृध्द कोरोना बाधित अत्यावस्थ रुग्ण बरे होऊन डिसचार्ज करण्यातआले.
येरवडा येथील ६५ वर्षांचा पुरुष रुग्ण दि.१२/४/२०२० ससून रुग्णालयात दाखल झाला .
त्यालाही ऑक्सीजन वर ठेवण्यात आले होते. बरे झाल्यानंतर दि.२८ एप्रिलला सदर
रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
गुलटेकडी येथील ६५ वर्षे वयाचा पुरुष रुग्ण दि.४ एप्रिल २०२० रोजी ससून मध्ये दाखल करण्यात आला होता, त्याला रक्तदाबाचा आजार होता. उपचारांनी बरे झाल्यानंतर २८ एप्रिल २०२० रोजी या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
• मुकुंद नगर येथील ६४ वर्ष वयाचा पुरुष रुग्ण दि.१० एप्रिल २०२० रोजी ससून रुग्णालयात दाखल झाला होता, त्याला नेफोलिथियासिस हा किडनीचा आजार होता. दि.२८/४/२०२० रोजी त्याला ससून रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले.
• ६० वर्ष वयाचा गंज पेठेतील रहिवासी पुरुष रुग्णास दि.५/४/२०२० रोजी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला मधुमेह, रक्तदाब, अस्थमा असे आजार
होते, त्याला ऑक्सणीन लावण्यात आला होता. तसेच इन्शुलिनही चालू होते. कोव्हीड चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर व सदर रुग्णाची प्रकृती बरी झाल्यानंतर या रुग्णास ससून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
बय- ५५ वर्षे, पुरुष रुग्ण,रा, शुक्रवार पेठ, पुणे हा ससून रुग्णालयामध्ये कोन्हीड-१९ साठी उपचार घेत होता, त्याला रक्तदाबाचा त्रास होता. तसेच त्याला निमोनायटीस झाला होता,उपचारानंतर दि.२८ एप्रिल २०२० रोजी सदर रुग्णाला ससून मधून डिस्चार्ज देण्यात आला.
। पर्वती दर्शन येथील ५५ वर्षे वयाची महिला दि.१५/४/२०२० ला ससून रुग्णालयात दाखल झाली.तिला कोव्हीड बरोबरच मधुमेह, रक्तदाब व लठ्ठपणा हे ही आजार होते. या महिला रुग्णाला ऑक्सीजनवर ठेवण्यात आले होते. इन्शुलिन व इतर औषधांच्या उपचारानंतर या
महिलेची कोव्हीड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर दि.२८/४/२०२० ला ससून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
गणेशनगर, दापोडी येथील ५० वर्षे वयाचा पुरुष रुग्ण दि.९/४/२०२० रोजी ससून रुग्णालयात दाखल झाला होता, त्याला रक्तदायाचा विकार होता. त्याला नॉन इनव्हेजीब व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. या रुग्णाचा कोव्हीड निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर व प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला २८ एप्रिल २०२० रोजी डिस्चार्ज देण्यात आला.
अशी माहिती  प्रसिद्धीपत्रकाद्वारे अधिष्ठाता बी .जे .शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ससून सर्बोपचार रुग्णालय,पुणे.यांनी दिली आहे


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय - उपमुख्यमंत्री अजित पवार
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टरांची निवास व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये
Image