५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री.श्री.अजित पवार व संसदरत्न,खासदार सौ.सुप्रिया सुळे यांचे पुढाकारातून व जहाँगीर ट्रस्ट वतीने बारामती व इंदापूर तालुक्यातील ५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती याठिकाणी करण्यात आले.
तसेच या मुलांना कारगिल कंपनी तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या ५० मुलांपैकी एका गरजू मुलाला ट्रस्ट ने १२०००/- रुपये किंमतीचे रेफ्रिजरेटर मोफत दिले.
यामध्ये प्रामुख्याने इन्सुलिन किट-मेडिसिन,रेफ्रिजरेटर व जीवनावश्यक वस्तू अशा एकूण ६ लाख १२ हजार रुपये किंमती च्या अत्यावश्यक वस्तूंचे वाटप तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष श्री.संभाजीनाना होळकर,मुंबई मंत्रालय कक्ष अधिकारी श्री.अमोल भिसे,डॉ.सौरभ मुथा,जहाँगीर ट्रस्ट चे डॉ.संध्या गायकवाड मॅडम व टीम यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी तालुका राष्ट्रवादी वकील सेल चे अध्यक्ष श्री.रविंद्र माने,तालुका सोशल मिडिया चे अध्यक्ष श्री.सुनिल बनसोडे तसेच डायबेटिस बालक,विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय - उपमुख्यमंत्री अजित पवार
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टरांची निवास व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये
Image